15 July 2020 10:38 PM
अँप डाउनलोड

भाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही ? राज ठाकरे

Raj Thackeray, MNS, BJP, Sangali Flood, Kolhapur Flood, , Post pond assembly election 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सध्याच्या परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांची घरदार आयुष्यच नष्ट झाली आहेत आणि ती परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतील. तसेच पूर जरी ओसरला तरी मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली आणि विषयाचे गांभीर्य प्रसार माध्यमांच्या समोर मांडले. अशा परिस्थितीत तिथली लोकं अडकली असताना त्यांच्याकडे मत जाऊन मागायची का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या याच विषयाला अनुसरून सुरु असलेल्या मार्केटिंग आणि राजकारणाचा देखील त्यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सरकारला हा पूर परिस्थितीचा अंदाज आला नव्हता आणि त्यामुळे मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्याचे’, त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले होते. नेमका त्याच विषयाचा धागा संदर्भ घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटलांना पूर परिस्थितीचा अंदाज येत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीत किती जागा निवडून येणार याचा त्यांना अचूक अंदाज येतो’ असा टोला लगावला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(57)#Raj Thackeray(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x