15 May 2021 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

भाजप अडचणीत | औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा | केंद्राला पत्र

CM Uddhav Thackeray, writes letter, Modi government, Aurangabad airport

औरंगाबाद, ६ जानेवारी: एकाबाजूला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहील्याचं वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

 

News English Summary: Maharashtra CM Uddhav Thackeray writes to Central Government asking to take a decision on changing the name of Aurangabad Airport to Chhatrapati Sambhaji Maharaj Airport said Maharashtra Chief Minister’s Office.

News English Title: CM Uddhav Thackeray writes letter to Modi government for changing name Aurangabad airport news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(378)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x