15 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

भाजपाची सत्ता असलेल्या महानगरपालिकेत शिंदे गटातील नगरसेवकांचं भवितव्य अंधारात | नाशिकचे शिवसेना नगरसेवक सतर्क

Shivsena

Shivsena | आदित्य ठाकरे अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तर आता आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर नाशिकचे नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण सोबत असल्याचं सांगणार आहेत.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी :
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. या सगळ्या घटनांदरम्यान शिवसेनेतील ही गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरे अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तर आता आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर नाशिकचे नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण सोबत असल्याचं सांगणार आहेत.

सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर जाणार :
नाशिकचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास ते उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदार सध्या शिंदे गटात दाखल झालेले आहेत. मात्र नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा विश्वास हे सर्व आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन देणार आहेत.

महापालिकेत भाजपाची सत्ता आणि शिंदे गटातील नगरसेवक :
दरम्यान, भाजपाची सत्ता असलेल्या सर्व महानगरपालिकेत शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांचं राजकीय भवितव्य अंधारात असल्याचं म्हटलं जातंय. भाजपचे विद्यमान नगरसेवक त्यांच्या सध्याच्या जागा आणि द्वितीय क्रमांकावरील जागा आपल्याकडेच घेऊन शिंदे गटाला आयत्यावेळी शह देतील असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तसेच शिंदे गटातील नगरसेवकांचा केवळ शिवसेनेची मतं फोडण्यासाठीच उपयोग केला जाईल आणि परिणामी शिंदे गटातील नेत्यांच्या देखील काहीच हाती लागणार नाही असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे राजकीय भावनेच्या भरात शिंदेच्या गटात जाणाऱ्यांचे राजकीय भविष्य अंधारात असेल असं तज्ज्ञांनी वाटतंय. तसेच शिंदे आपल्याला निवडून आणतील या स्वप्नात अनेकजण तिकडे जातं आहेत, तर भाजपचे स्थानिक नेते शिंदे गटातील नेत्यासाठी मेहनत करतील या दुसऱ्या स्वप्नात शिंदे गटातील नेते असल्याने त्यात अनेकांचा राजकीय बळी जाणार याद वाद नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Nashik Corporators will meet to Uddhav Thackeray check details 24 July 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x