16 October 2021 11:28 PM
अँप डाउनलोड

शेकडो निरपराधांचे बँकेत मृत्यू झाले, तरी मोदींना नोटाबंदी हा झटका वाटत नाही?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी नोटाबंदी, राम मंदिर, RBI मधील वाद आदी विविध मुद्द्यांवर लोकसभा निवडणुका जवळ येताच भाष्य केले. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या मुलाखतीतील मोदींच सर्वात आश्चर्यकारक उत्तर हे नोटबंदी संबंधित प्रश्नावर पाहायला मिळालं. सदर प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, २०१६ मध्ये संपूर्ण देशात लागू झालेली नोटाबंदी हा काही झटका नव्हता, उलट आम्ही लोकांना वर्षभर आधीच पूर्वसूचना दिली होती, असे मोदींनी सांगितले. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी तो दंड भरून जाहीर करावा, अशी मुभा सरकारने दिली होती, पण लोकांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते, असा दावाही त्यांनी केला.

आपल्याजवळील काळा पैसा दंड भरून बँकेत जमा करा, अशी मुभा सरकारकडून आधीच दिली गेली होती. परंतु, मोदीसुद्धा इतरांसारखेच केवळ बोलघेवडे असतील, या भ्रमात सामान्य लोकं राहिले. त्यामुळे आमच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अखेर वर्षभराने म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाली, असे मोदी यांनी स्पष्ट केले. सदर मुलाखतीत मोदींनी सरसकट सर्वच लोकांना काळ्यापैशाचे धनी असाच समज केला, असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x