16 December 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मुखयमंत्री शिंदेंचा सर्वाधिक वेळ स्वतःच्या राजकीय गट विस्तारात | गेल्या 24 दिवसांत राज्यात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन बदलले पाहिजे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा संकल्प करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या 24 दिवसांमधील चित्र हे वेगळे असून राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही 24 दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला 24 दिवसांत कृषिमंत्री मिळाले नाही.

मागील 23 दिवसांमध्ये सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यात केल्या आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये 13 आणि यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2 आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषि खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Total 89 farmers committed suicide during last 23 days of Shinde government check details 24 July 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x