18 April 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

बीड | मराठा मोर्चा सांगून भाजपच मोर्चा काढण्याच्या तयारीत?

Maratha reservation

बीड, ०५ जून | मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अशात आज (५ जून) मराठा मोर्चा निघणार आहे. “बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

विनायक मेटे यांनी नुकतंच नारायणगडाचं दर्शन घेतलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचं साकडं घातलं आहे. बीडमध्ये मराठा मोर्चा निघणार आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा विनायक मेटेंनी दिला

मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी 3 डीवायएसपी, 11 पीआय, 28 पीएसआय, 96 महिला पोलिसांसह 306 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय एसरपीएफच्या तुकडीसह जवळपास 600 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच एसरपीएफची एक तुकडीही बीड शहरात तैनात करण्यात आली आहे.

 

News English Summary: The Maratha community has become increasingly aggressive for Maratha reservation. The Maratha Morcha is going to start today (June 5). Vinayak Mete, leader of Shiv Sangram Sanghatana, has decided that no matter how many thousands of policemen are deployed in Beed, the morcha will start.

News English Title: Beed Maratha Kranti Morcha or BJP party morcha is confusion news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x