23 April 2024 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

भारताने स्वीडनप्रमाणे हर्ट इम्युनिटी पद्धतीचा वापर केला पाहिजे - उदयनराजे भोसले

India, heart immunity, corona, Sweden, Udayan Raje Bhosale

सातारा, १ जुलै : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पा ओलांडला असून या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४ हजार ८७८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २४५ कोरोनाबळींची नोंद झाली आहे. यापैकी ९५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील असून १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७५ हजार ९७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान सध्याच्या परिस्थितीवर उदयनराजे भोसले यांनी मत मांडलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आल्या परिस्थितीला न घाबरता सामोरं जावं लागेल असं त्यांनि म्हटलं तसेच कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय, स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ट इम्युनिटी पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे भारतानेही वापर करावा, असे उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं.

पुढे ते म्हणाले की, मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज, त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. दुर्दैवाने इतरही अनेक व्हायरसमुळे लोकांचे निधन झालेलं आहेच. लोकांनी या व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऐकमेकांवर होणाऱ्या टीकांबद्दल बोलताना, ह्यांनी त्याच्यांवर केली अन् त्यांनी ह्यांच्यावर केली, मग त्यांना जाऊन विचारा. माझा काय संबंध त्यावर बोलायचा, असे म्हणत टीकात्मक राजकारणावर बोलण्यास उदयनराजेंनी नकार दिला.

 

News English Summary: Corona is used for no reason, the way heart immunity is used in Sweden. India should use the same, said Udayan Raje. He also advised that no one should be involved in politics in the Corona crisis.

News English Title: India should use heart immunity on corona like Sweden said Udayan Raje Bhosale News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x