15 May 2021 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

शेतकऱ्यांचा गुन्हा काय? भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून धर्मा पाटलांच्या कुटुंबाला नजरकैद?

धुळे : केवळ मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना सरकारची ही कारवाई म्हणजे या सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती असल्याची बोचरी टीका दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध.

BhagyaVivah Marathi Matrimonial

धनंजय मुंडे यांनी ट्विट करून भाजप-शिवसेना सरकारवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येणार असल्याने दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या विखरण ता.शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी ६ वाजल्यापासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते.

परंतु, दुपारी मुख्यमंत्री दोंडाईचा येथून कार्यक्रम आटपून गेल्यानंतर सुद्धा नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, मी २४ डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी पत्र लिहून दिले होते की, मुख्यमंत्रीच्या दौऱ्यात आपण कोणत्याही प्रकारच्या गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. आणि माझ्याकडून तसे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. परंतु, इतकी लेखी हमी दिली असताना सुद्धा मला आणि माझ्या आईला सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस ठाण्यात विनाकारण बसवून ठेवले होते.

त्यामुळे आता स्वत: राज्याचे मंत्री महोदय पोलीस स्थानकात येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(613)#Shivsena(1082)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x