19 August 2019 3:26 AM
अँप डाउनलोड

पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी

पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी

पुणे : अखेर पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स संपवत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नुकतेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी नऊ जागांची यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील २ जागांचा समावेश आहे. पुण्यात काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर रावेरमध्ये डॉ. उल्हास पाटील काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Congress(243)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या