8 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
x

मुरजी पटेल-केसरबेन पटेल यांच्यासहित ५ नगरसेवकांवर जातीच्या दाखल्या अभावी राजकीय गंडांतर?

BJP, Shivsena, Congress

मुंबई : जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण पाच नगरसेवकांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर देणार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता थोड्या वेळातच निकाल अपेक्षित आहे.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते. दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला यासर्व संबंधित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.

त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या ५ उमेदवारांना नवीन वर्षाची अनोखी भेट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २८-मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ६७ मध्ये प्राची परब ( शिवसेना), प्रभाग क्रमांक -७६ मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे ( काँग्रेस), प्रभाग क्रमांक -८१ मध्ये संदीप नाईक ( शिवसेना), प्रभाग क्रमांक ९० मष्ये बेनीडिट किणी ( समाजवादी पार्टी) यांना ही संधी मिळणार आहे.

दरम्यान काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या १८ डिसेंबरला मुंबई हायकोर्टाने रद्द केल होतेे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक ३२ च्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना देखिल पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९३,भाजपा ८५, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, समाजवादी ६, एमआयएम २ आणि मनसे १ असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x