12 December 2024 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका - राम शिंदे

BJP leader Ram Shinde, Mahavikas Aghadi government, Milk rates

नगर, १ जुलै : राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते शनिवारी सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी राम शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले.

तसेच हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर बोचरी टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केली होती. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

 

News English Summary: The Mahavikasaghadi government in the state is a husband’s two wives, said former minister and BJP leader Ram Shinde. He was speaking during an agitation on the Solapur-Nagar highway on Saturday.

News English Title: BJP leader Ram Shinde take a dig on Mahavikas Aghadi government over milk rates News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x