मुंबई : येत्या थर्टी फर्स्टला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई शहरातील सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या आणि अधिकृतपणे खुली ठेवावीत अशी लेखी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वार मागणी केली आहे.

याआधी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी रात्रभर दुकाने, हॉटेल खुले ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान मुंबई आणि अन्य शहरं २४ तास सामान्यांसाठी खुली राहावीत, या विषयाला अनुसरून एक प्रस्ताव २०१७ मध्ये विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु, सदर प्रस्ताव गृह खात्याकडे काही महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकला आहे. त्यामुळे या प्रस्तावाची आठवण आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना ट्विटरवरून दिली आहे.

काय आहे ते नेमकं लेखी पत्र आणि ट्विट?

Aditya thackeray remind fadanvis over night life party proposal