15 December 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

महागाई आणि भारत बंद; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संध्याकाळी पत्रकार परिषद

नवी दिल्ली : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती.

आजच्या बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. परंतु महाराष्ट्राचा विचार करता या भारत बंद मधील राज ठाकरेंच्या कार्यकत्यांचीच आणि त्यांच्या आंदोलनाची दखल माध्यमांनी सार्वधिक घेतली असं चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच मनसे शिवाय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे आंदोलन आक्रमक पणे यशस्वी करू शकले असते का, याबातच शंका उपस्थित होऊ लागली आहे.

परंतु मनसे सक्रिय पणे रस्त्यावर उतरल्याने भारत बंदचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे. महाराष्ट्रात काही किरकोळ गोष्टी वगळता एखादी अति हिंसक घटना घडली नसून, महाराष्ट्र सैनिकांनीच राज्यातील महागाईविरोधातील भारत बंद हायजॅक केल्याचे चित्र आहे. परंतु मनसेच्या सक्रिय सहभागामुळे शिवसेनेकडून दिवसभर द्विधा मनस्थिती असल्यासारख्या प्रतिक्रिया दिवसभर येत आहेत.

संपूर्ण भारत बंदचा राज्यातील आढावा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x