1 May 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

महागाई विरोधात भारत बंद; सत्तांतर निश्चित होणार : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशात राजकीय सत्तांतर निश्चित असून विरोधकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं’, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील भाषणादरम्यान केलं आहे. पेट्रोल तसेच डिझेलच्या आणि एकूणच इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने धरणं आंदोलन सुरु केलं असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले आहेत.

सध्या इंधन दरवाढ आणि एकूणच प्रचंड वाढलेले महागाई बघता काँग्रेसने देशभर त्याविरोधात भारत बंद’चा नारा दिला असून त्याला देशभरातील २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सर्वप्रथम आज सकाळी राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राहुल गांधींनी मानससरोवरयेथून आणलेलं पवित्र जल महात्मा गांधीच्या समाधीवर अर्पण केलं. त्यानंतर राहुल गांधींनी इंधन दरवाढी विरोधात रामलिला मैदानापर्यंत मार्चला सुरुवात केली आणि भाजप विरुद्धच्या भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

त्यावेळी देशभरातील विविध पक्षांचे नेते दिल्लीत उपस्थित होते. या मार्चमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, तारिक अन्वर, राजदचे नेते मनोज झा, जेडीएसचे नेते दानिश अली, आरएलडीचे नेते जयंत चौधरी आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंहही सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x