16 December 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

अहमदनगर: फडणवीस सरकारच्या काळातील टँकर घोटाळ्याची चौकशी होणार

NCP MLA Rohit Pawar, Former CM Devendra Fadnavis, Tanker Scam

अहमदनगर : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप एनसीपीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. संबंधित बैठकीत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासारख्या पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मागितला असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळालं. सदर बैठकीत प्रामुख्याने ३ मागण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या हे ३ प्रमुख विषय चर्चेत होते. या तिन्ही विषयांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात संगमनेर या ठिकाणी झालेल्या युवा महोत्सवात आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, आदिती तटकरे आणि जिशान सिद्दीकी या युवा आमदारांची मुलाखत अवधूत गुप्ते यांनी घेतली होती. या मुलाखतीत सगळ्याच तरुण आमदारांनी अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.” असं रोहित पवार त्यावेळी म्हणाले होते.

 

Web Title:  NCP MLA Rohit Pawar alleges Tanker scam during tenure of former CM Devendra Fadnavis in Ahmednagar.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x