8 May 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे सेनेला ठरवायचे आहे: देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena

नागपूर: कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किची लाचारी ठेवायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाहीस अशा शब्दात काँग्रेसच माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेतल्याची टीका करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जारदार टीकास्त्र सोडलं.

शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती, तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता, त्याच सेनेकडून काँग्रेस, एनसीपीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. शिवसेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चर्चेची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे. सावरकर यांचा त्याग राहुल गांधींना माहिती नाही, असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणीही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं असल तरी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची चर्चा नाही. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीनं सरसकट कर्जमाफी आणि कोरा सातबारा करण्याचं आश्वासनं दिलं आहे. ते कधी करणार त्याचा कार्यक्रम सरकारनं जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे,”अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

 

Web Title:  Former Chief Minister and Opposition Leader Devendra Fadnavis Criticized Government Over Ministry Expansion

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x