8 July 2020 12:07 AM
अँप डाउनलोड

अवधूत वाघ यांनी सिंचन घोटाळ्यांची प्रकरणं बंद होताच अजित पवारांचं अभिनंदन केलं

BJP Spokesperson Awadhut Wagh, Ajit Pawar, Irrigation scam

मुंबई: भाजपमध्ये क्लीनचिट म्हणजे गमतीचा विषय बनत चालला आहे आणि त्याचं अजून उदाहरण समोर आलं आहे. यातच, कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचे समजते. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक गंभीर प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरण झाली असली तरी भाजप पक्ष स्वतःच्या पक्षात आणण्यापूर्वी नेत्यांना क्लीनचिट देण्याचे अमिश दाखवतो असंच काहीस समोर येताना दिसत आहे. त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यावर रावसाहेब दानवे म्हणाले होते निर्लज्जासारखे म्हणाले होते की, आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर आहे, ज्यामध्ये आम्ही इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना धुतो आणि मगच पक्षात प्रवेश देतो.

अजित पवार जेव्हा भाजपच्या गळाला लागले तेव्हा त्यांना देखील असंच आमिष आणि वचन दिलं असणार असा आधीच करण्यात येत होता. मात्र त्याला आता दुजोरा मिळताना दिसत आहे. करणं भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचं वृत्त मणिकंट्रोल’ने दिलं आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. देवेंद्र फडणवीस हे २०१२ मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x