12 December 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

तुम्ही आमच्यावर कितीही आरोप लावा | आम्हाला काही चिंता नाही - फडणवीस

Devendra Fadnavis, press conference, Phone tapping case

मुंबई, २७ मार्च: पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचं काम कुणी केलं? वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. सचिन वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आलं. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचं नाव झालं ते सांगा? असा सवाल त्यांनी केला.

तसचे, “नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील? जेवढे वाझेचे मालक आहेत ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत की, आता कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर येतील? कारण की ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत. यावरून हे लक्षात येतं, की एकप्रकारचे सिंडेकेट राज सुरू होतं त्यांनी मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली आहे. अगोदर स्वतःकडे वाकून पाहा मी समजू शकतो, तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही आमच्यावर कितीही आरोप लावा, आम्हाला काही चिंता नाही.” असं देखील यावेळी फडणीस यांनी बोलून दाखवलं.

 

News English Summary: A report on phone tapping regarding transfers in the police force has been submitted to the Union Home Ministry. Leader of the Opposition Devendra Fadnavis has claimed that the leaders of the state are upset as the truth of many will explode.

News English Title: Devendra Fadnavis press conference over phone tapping case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x