20 April 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप योजना सुरु | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

Kusum Solar Pump Yojana 2021

मुंबई, १४ सप्टेंबर | कुसुम सोलर पंप योजना सुरु झालेली आहे अशा आशयाची बातमी शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे. https://www.mahaurja.com/ या वेबसाईटवर या कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करायचे आहेत. ( ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता)

कुसुम सोलर पंप योजना सुरु, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य – Kusum Solar Pump Yojana information in Marathi :

Kusum Solar Pump Yojana ९० टक्के अनुदानावर मिळणार सौर कृषी पंप:
प्रधानमंत्री कुसुम – ब योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ७.५ HP, ५ HP व ३ HP क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अर्ज करता येणार आहेत. Kusum Solar Pump Yojana अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीज नाही त्यांनाच हि योजना मिळणार आहे. ९० टक्के अनुदान ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ९५ टक्के अनुदान अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. Kusum Solar Pump Yojana योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.mahaurja.com/ या महाऊर्जाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:
सौर कृषी पंप योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे अर्ज करतांना कोटा संपलेला आहे असे मेसेज येऊन त्यांचा अर्ज रिजेक्ट होत होता. त्यामुळे आता अशा शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे ज्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कुसुम सोलर योजनेची अधिकृत बातमी बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

कुसुम सोलर योजनेची बातमी येथे वाचा Click Here Or Copy Link: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/kusum-yojana-batmi.pdf

महाउर्जा वेबसाईटवर भरले जाणार Kusum Solar Pump Yojana योजनेचे अर्ज:
शेतामध्ये लोडशेडींग मुळे रात्रपाळी करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकला पाणी देण्याची वेळ येते. जर शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप असेल तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना दिवसा पाणी देता येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर घ्यावयाचा आहे ते शेतकरी Kusum Solar Pump Yojana अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. महाउर्जा वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. महाउर्जा वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्जासाठी लिंक (येथे क्लिक करा) OR Copy Link: https://kusum.mahaurja.com/solar/benf_login

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: How to apply for Kusum Solar Pump Yojana 2021.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x