19 April 2024 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Tirumala Tirupati Devasthanams Trust | Tirupati Balaji | तिरुमला तिरुपती देवस्थानबदल माहिती

Tirumala Tirupati Devasthanams Trust

हैदराबाद, १६ सप्टेंबर | तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरं सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट आहे. तिरुपती व्यंकेटेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहण्याचं काम या ट्रस्टकडे आहे. तिरुपतीमध्येच टीटीडी म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचं कार्यालय आहे. जिथं तब्बल 16 हजार कर्मचारी काम करतात.

Tirumala Tirupati Devasthanams Trust, Tirupati Balaji, तिरुमला तिरुपती देवस्थानबदल माहिती  – Tirumala Tirupati Devasthanams Trust information in Marathi :

तिरुपती देवस्थान ट्रस्टचा इतिहास काय?
टीटीडीची स्थापना 1932 मध्ये झाली होती. यासाठी टीटीडी अधिनियम बनवण्यात आला. मंदिराच्या संचालनासाठी 7 सदस्यांची एका कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मद्रास सरकारद्वारे आयएएस दर्जाच्या एका आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. समितीला सल्ला देण्यासाठी 2 सल्लागारांची नियुक्ती झाली. याशिवाय पुजाऱ्यांचीही नियुक्ती यामध्ये करण्यात आली.

1969 नंतर मंदिर ट्रस्ट सदस्यांची संख्या वाढवली:
आंध्र प्रदेश चॅरेटेबल ट्रस्ट आणि हिंदू धार्मिक संस्थान आणि एव्हॉमेंट अॅक्ट हा 1969 साली पास झाला. त्यानंतर ट्रस्ट्रीची संख्या 5 वरुन 11 करण्यात आली. तर 1979 साली ही सदस्य संख्या 11 वरुन 15 करण्यात आली. वंशावळीनुसार पुजारी बनण्याची पद्धत संपवण्यात आली. गैरहिंदूंना तिरुपतीला भेट द्यायची असल्यास, त्यांना व्यंकटेश्वरावर विश्वास आहे असं लिहलेल्या फॉर्मवर सही करण्याचा कायदा आला.

मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची:
मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकºयास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.

बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.

हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाह्यरूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.

Tirupati Balaji information in Marathi :

कल्याण कट्टा / केसांचे दान:
तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रात देवस्थानला ७४ कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.

मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठ्या इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणाºया भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणाºया पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.

येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणाºयाला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

टीटीडी ट्रस्ट अंतर्गत किती विभाग येतात?
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट अंतर्गत अनेक विभाग काम करतात. जसं की लाडू बनवण्याचा विभाग, रस्ते आणि पूल बनवण्यासाठी इंजिनिअरिंग विभाग, पाण्याच्या नियोजनासाठी जलसंपदा विभाग, भक्तांना मंदिरापर्यंत आणणे आणि पुन्हा तिरुपतीत सोडण्यासाठी बसेसची गरज लागते. तिरुपती ट्रस्ट या बस मोफत पुरवतं, यासाठीचा पहिवहन विभाग, अर्थ आणि लेखापाल विभाग, जनसंपर्क विभाग, वन आणि उद्यान विभाग, मंदिर अनेक शाळा महाविद्यालयं चालवतं, रुग्णालयाची सेवा देतं यासाठीचा शिक्षण आणि आरोग्य विभाग. थोडक्यात सांगायचं झालं तर एक राज्य चालवायला जितका खटाटोप आहे, तितकाच खटाटोप हा तिरुपती संस्थान चालवायला करावा लागतो. संस्थानाचा पसारा एवढा मोठा आहे की त्याला सांभाळणं अवघ्या काही लोकांचं काम नाही. म्हणून देशभरातून या संस्थानावर सदस्य भरले जातात.

बाजारपेठ:
मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत. याचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगड्या, गळ्यातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साड्या, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.

काही टिप्स :
१. तिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.
२. विमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.
३. शक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.
४. कुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.
५. तिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणे पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Tirumala Tirupati Devasthanams Trust information in Marathi.

हॅशटॅग्स

#TirumalaTirupatiDevasthanams(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x