26 July 2021 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'सेनेतील आ. पाचपुतेंना श्रीगोंद्यात धक्का; पंचायत समिती खालसा

BJP MLA Babanrao Pachpute

श्रीगोंदा: श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापतीपदी गीतांजली शंकर पाडळे तर उपसभापतीपदी रजनी देशमुख यांची निवड करून पंचायत समिती वर काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला आहे. भाजपचे सदस्य असलेले अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत वेळेत सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भाजपचे ६ व आघाडीचे ६ असे समान संख्याबळ झाले होते.

महाविकास आघाडीच्या हालचालीनंतर भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केलं होतं. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही ती तयारी सुरू केली होती. मात्र सर्वात हासास्पद गोष्ट म्हणजे राजकारणात वजन शिल्लकच राहिलेलं नसलेल्या नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती.

राजकारणात वेगळा पक्ष काढून देखील डाळ न शिजल्याने नारायण राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची वेळ आली आणि त्यात जेव्हा नारायण राणेंनी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हटल्यावर सुधीर मुंनगंटीवार यांनी त्याला छेद देत राणेंचं भाजपातील वजन निश्चित केलं होतं. आता हेच नेते स्वतःच्या मतदासंघात पंचायत समित्या स्वतःच्या पक्षाकडे राखण्यात देखील असमर्थ ठरत आहेत. तीच अवस्था आता राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या आमदार बबनराव पाचपुते यांची झाली आहे.

 

Web Title:  NCP Party won Srigonda Panchayat Samiti from BJP MLA Babanrao Pachpute.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(647)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x