26 July 2021 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

काँग्रेस चा "गुजरात विजय" थोडक्यात वाचला ?

गांधीनगर : गुजरातमध्ये विधानसभा २०१७ निवडणुकीत एकूण 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांच्या फरकाने भाजपने निसटता विजय मिळवला. ज्यामुळे काँग्रेस चा “गुजरात विजय” थोडक्यात हुकला. या १२ जागांवर काँग्रेसचे उमेद्वारांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली परंतु शेवटपर्यंत भाजपच्या उमेदवारांची धाकधूक वाढली होती. जर या जागा हाती लागल्या असत्या तर काँग्रेस चा “गुजरात विजय” निश्चित झाला असता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपच्या सलग २२ वर्षाच्या कार्यकाळाला आणि थेट मोदींना च गुजरात मध्ये राहुल गांधींनी चांगलेच आव्हान दिलं. १५० जागांचे ध्येय ठेवलेल्या गुजरात भाजपने, अमित शहांनी आणि नरेंद्र मोदींना साधी शंभरी गाठताना हि डोईजड झालं होतं. शेवटी संपूर्ण निकाल हाती येई पर्यंत कश्याबश्या ९९ जागा भाजपच्या पदरी पडल्या आणि मोदींनी ही सुटकेचा निःश्वास सोडला असावा. काँग्रेस ने हि एकूण ८० जागा पदरी पाडून घेतल्या आणि बहुमताच्या आकड्यापासून केवळ १२ जागांनी कमी पडले.

थोडक्यात आणखी अधिक मेहेनत केली असती तर राहुल गांधींनी थेट मोदींना त्यांच्याच गुजरात मध्ये धोबीपछाड दिला असता आणि गुजरात ची सत्ता काबीज केली असती

या 12 जागांवर काँग्रेसचा राहुल गांधींच्या नैतृत्वात निसटता पराभव झाला.

१. उमरेठ – भाजप ने काँग्रेसच्या कपीलाबेन चावडा यांचा 1883 मतांनी पराभव केला.

२. राजकोट ग्रामीण – भाजपने या जागेवर केवळ 2179 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

३. खंभात – काँग्रेसच्या खुशमनभाई पटेल यांचा 2 हजार 318 मतांनी पराभव झाला.

४. वागरा – भाजपचा केवळ 2 हजार 628 मतांनी विजय.

५. फतेहपुरा – भाजपचा केवळ 2 हजार 711 मतांनी विजय.

६. विसनगर – भाजपचे उमेदवार केवळ 2 हजार 869 मतांनी विजयी झाले.

७. गोध्रा – केवळ 258 मतांनी या जागेवर भाजपच्या सी. के. राऊलजी यांचा काँग्रेसच्या राजेंद्रसिंह परमार यांचा पराभव केला.

८. धोलका – भाजपच्या विजयी उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा केवळ 327 जास्त मतं जास्त मिळवली आहेत.

९. बोटाद – भाजपचे सौरभ पटेल आणि काँग्रेसच्या धीरजलाल कठथीया या दोघांच्या मतांमधील फरक केवळ 906 एवढा आहे.

१०. विजापूर – काँग्रेसच्या नाथाभाई पटेल यांचा केवळ 1164 मतांनी पराभव केला.

११. हिमतनगर – भाजपचा केवळ 1712 मतांनी फरकाने विजय झाला.

१२. गारियाधार – इथे भाजप उमेदवाराने काँग्रेसच्या परेशभाई खेनी यांचा केवळ 1876 मतांनी पराभव केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x