27 July 2021 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

स्कुलबसवर करणी सेनेचा भ्याड हल्ला : सर्वच स्तरातून चीड व्यक्तं.

चंदीगढ : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या विरोधात करणी सेनेने अक्षरशः देशभरात धुमाकूळ घातला आहे. पण आता हद्द म्हणजे गुरुग्राममध्ये करणी सेनेच्या गुंडांनी अक्षरशः लहान मुलांच्या स्कुलबसवर हल्ला केला आहे. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्कुलबसवर केलेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या लहान मुलं स्कूलबसमधील शिक्षकांच्या मागे लपली तर काही जण घाबरुन रडू फुटलं. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संबंधित स्कूलबस जीडी गोयंका वर्ल्ड शाळेची असल्याचे समजले. संध्याकाळी घरी परतत असताना हा भ्याड हल्ला करणी सेनेच्या गुंडांनी केला. अचानक केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे भेदरलेली 10 वर्षाच्या आतली मुलं स्कूलबसमधील शिक्षकांच्या मागे लपली तर काही चिमुरड्यांना घाबरून रडू फुटलं. भाजपाकडून या हत्यारांचा होणारा वापर देशात आग पेटवत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x