14 November 2019 12:06 AM
अँप डाउनलोड

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास पुढची १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही

मुंबई : सध्या लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला आहे. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर आणि बाबरी जागेच्या विवादावर सुनावणीदरम्यान थेट जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी न्यायालयीन कालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहिलो तर १,००० वर्षे उलटून गेली तरी राम मंदिर काही होणार नाही,’ असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी आता केंद्र सरकारनंच हस्तक्षेप करून वेगळी भूमिका घ्यावी, अशी मागणी काही हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांकडून पुढे येत आहे. तसेच केंद्र सरकारनं मंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा,’ अशी मागणी याआधीच शिवसेनेनं केली आहे. तसेच दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीची संपूर्ण तयारी झाली आहे असं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचा अयोध्या दौरा हा मोदी सरकारला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठीआहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(61)#Shivsena(726)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या