24 April 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल
x

कट्टर राजकीय विरोधक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर

BJP Leader Pankaja Munde, Minister Dhananjay Munde

बीड: कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा ४२ व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.

गहिनीनाथ गडावर दरवर्षी भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. परंतु, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही जाहीर कार्यक्रमात हजेरी पाहायला मिळली. विधानसभा निवडणुकांनं यावेळी धनंजय यांनी पंकजा यांचा दारुण परावभ केला. निवडणूक वैयक्तिक आरोपांनी राज्य भर गाजली होती.या पार्श्र्वभूमीवर मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर आले होते.

या पराभवानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिनानिमित्त भाषण केले. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय पंकजा मुंडेंनी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचं सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं. पक्ष काढायचा की काय करयचं ते पुढे ठरवूच पण आता पक्षाने ठरवायचं आहे, असं म्हणत पंकजांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला होता.

विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान केज तालुक्यातील वीडा येथे प्रचारसभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून दोघांतील संघर्ष वैयक्तिक पातळीवर आला.यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापलं होतं. भावणीक पातळीवरील आरोपानंतर या निवडणुकीत धनंजय यांनी पंकजा यांचा तब्बल बत्तीस हजार मतांच्या फरकाने दारुण पराभव केला. राज्यातही संत्तातर झाले आणि दोघांच्या भुमिकांचीही अदलाबदल झाली.

 

Web Title:  Beed BJP Leader Pankaja Munde and Minister Dhanjay Munde on same stage.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x