15 May 2021 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

भाजपाकडे संख्याबळाचं नसल्याने संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध

MLA Sanjay Daund, MInister Dhananjay Munde

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले आहेत. बीड विधानपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून दाखल झालेला राजन तेली यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे संजय दौंड यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. येत्या २४ जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता असेल हे स्पष्ट झालं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल आहे. संजय दौंड १९९२ पासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात आली आहे.

एकीकडे पुण्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट होत असताना, तिकडे बीड विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली. कारण संख्याबळाअभावी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली. त्याआधी अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला माघार घेण्याचंही आवाहन केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली. बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले.

 

Web Title:  Selection of Congress Leader Sanjay Daund on legislative council.

हॅशटॅग्स

#NCP(352)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x