12 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

या दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना? सविस्तर

Rajinikanth, Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु, लोकसभा निवडणूक न लढविण्याची चर्चा मनसेवर केंद्रित असली तरी तसाच प्रकार तामिळनाडूच्या राजकारणात देखील झाला आणि त्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तामिळनाडूतील लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याच चित्रं अनेक सर्व्हेमध्ये समोर येत आहे आणि त्यात भाजपाला एआयडीएमके’सोबत युती करून देखील काहीच उपयोग होणार नसल्याचं चित्र समोर येत आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरु आहे आणि त्यापैकी कर्नाटकात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. दुसरीकडे तेलंगणात विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न केला खरा, परंतु तेलंगणा राष्ट्र समितीने भाजपाची स्वप्नं भंग केली. केरळात मंदिराआडून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा राजकीय फायदा होईल असं प्रथम दर्शनी तरी वाटत नाही. राहिला प्रश्न तामिळनाडूतील तर तिथे भाजपने रजनीकांत यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो रजनीकांत यांनी वेळीच ओळखला असं म्हणावं लागेल. मात्र योगायोगाने एआयडीएमके’च्या जयललिता यांचं निधन झालं आणि कमकुवत झालेला एआयडीएमके’ला भाजपने गळ घातला आणि ते युती करण्यात यशस्वी झाले. परंतु काँग्रेस-डीएमकेच्या आघाडीसमोर त्यांचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. त्यात सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भाजपाला होणारा फायदा शून्य झाला. पक्ष स्थापनेवेळीच त्यांनी म्हटलं होतं की ‘काही लोकं राजकारणाच्या नावाने सामान्यांना लुटत आहेत, माझा पक्ष लोकशाही आणि लोकशाहीचे रक्षण करेल तसेच चुकीच्या गोष्टींवर आवाज उचलेल.

परंतु, भाजपच्या क्रॉस मार्केटिंगचा चांगलाच ज्ञान असल्याने रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा करते वेळी कोणीही माझ्या नावाचा उपयोग प्रचारात करू नये असं म्हटलं होतं. तसेच विधानसभेत त्यांचा पक्ष सर्वांच्या सर्व म्हणजे २३४ जागा लढवेल अशी घोषणा केली होती. त्यामुळे केवळ लोकशाही मानणाऱ्या आणि तामिळनाडूच्या मूळ प्रश्नांना महत्व देणाऱ्या पक्षालाच मत द्या हे सांगण्यामागे त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा भाजपवरच होता. त्यामुळे तामिळनाडूतील पाण्याच्या गंभीर प्रश्न त्यांनी महत्वाचा केला आणि त्याच मुद्याला अनुसरून कावेरी पाणी वाटपावरून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केंद्र सरकारवर मोठा रोष तामिळनाडूत आहे. परिणामी तिथे #मोदीगोबॅक सारखे प्रचार जोर धरू लागले आहेत. विशेष म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणातील दोन महत्वाचे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांच्या पत्नी स्वतः कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन गेल्या आणि कमल हसन देखील कृष्णकुंजवर गेले आहेत आणि ते देखील मोदी विरोधक म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे तिथल्या राजकारणाची त्यांना जाणीव नसणार असं होऊ शकत नाही.

महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष लोकसभा निवडणुका न लढता भाजप, मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात काम करा असा थेट आदेश पक्ष कार्यकत्यांना दिला आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष अर्थ हा काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असाच होतो. मराठी प्रसार माध्यमांनी २०१४ मधील मोदी लाटेनंतर मनसेचं सर्वत्र डिपॉझिट जप्त असे मथळे छापले, परंतु मोदी लाटेत देखील अनेक लोकसभा मतदासंघात त्यांना सव्वा-लाख ते ८०-९० हजार इतकी मतं पडली होती. याचाच अर्थ मनसेने हळुवार का होईना, परंतु स्वतःची पारंपरिक मतदारपेटी निर्माण केली आहे, ज्यांच्यावर मोदी लाटेचा काहीच परिणाम झाला नाही. मनसेची हीच मतं आणि जी मतं २०१४ मधील मोदी लाटेमुळे भाजप-शिवसेनेकडे वर्ग झाली होती, परंतु भाजप-सेनेच्या सत्ताकाळाचा अनुभव पाहून पुन्हा मनसे किंवा त्यांच्या अप्रत्यक्ष सहयोगी मित्रांकडे वर्ग झाल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला साहजिकच होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने राज ठाकरे विधानसभेचे दौरे करतील आणि पक्षाच्या मतदारांच्या संपर्कात राहतील.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यास राज्यात काँग्रेस हा नावालाच राष्ट्रीय पक्ष म्हणून उरला आहे. त्यांच्या स्थानिक नैतृत्वांचा पक्षाला राज्यपातळीवर काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. त्याउलट राष्ट्रवादी उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. मात्र राज्यात काँग्रेसच्या जाळ्यात ते अडकल्याने त्यांचा पक्ष विस्तार देखील खुंटला आहे. त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षासोबत अजून काही वर्ष राज्यात मजबुरी म्हणून चिटकून राहिल्यास राष्ट्रवादीचं भविष्य देखील अवघड आहे. त्यात राज्यात काँग्रेसकडे चेहराच नसून राहुल गांधी किंवा सध्याच्या गांधी परिवाराकडे राज्यातील मतदार आकर्षित होत नाही. तसेच उत्तर भारतीय समाजाचा कांगावा करत काँग्रेस स्वतःसोबत राष्ट्रवादीला देखील पुढे जाऊ देत नाही. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाचा उत्तर प्रदेशात काहीच राजकारण नसून, बिहारमध्ये तारिक अन्वर यांनी देखील पक्षाला रामराम केल्याने तिथे देखील पक्षाला काहीच अस्तित्व नाही. सध्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र आणि थोडफार गोव्याच्या राजकारणात भविष्य आहे. त्यामुळे शरद पवारांनी विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी मोहरा स्वतःकडे खेचून विधानसभेच्या वेळी मोठा राजकीय भूकंप करण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या जास्तीत जास्त ४-५ जागा लागतील असं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचं महत्व दखल घ्यावी असं राहणार नाही, हे शरद पवारांनी अचूक ओळखलं आहे.

त्यामुळे राज ठाकरेंच्या मदतीने स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचा आकडा १० ते १२ वर पोहोचवून दिल्लीत पक्षाचं स्थान मजबूत करण्याची योजना त्यांनी आखली आहे. त्यानंतर २-३ महिन्यातच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी-मनसे आणि इतर पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करतील असं सध्याच राजकरण सुरु आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासारखे धुरंदर राजकारणी एकाच मंचावर येऊन प्रचार करू लागले तर ग्रामीण आणि शहरी भागात कमीत कमी १०० जागा जिंकणं शक्य आहे आणि त्यानंतर इतर लहान पक्षांना तसेच अपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याची वेगळीच गणित शरद पवार राज ठाकरेंसोबत आखात आहेत, असं चित्र आहे.

राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात महत्वाचा असला तरी महत्वाच्या मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रबळ बनण्यासाठी राज ठाकरेंसोबत भविष्यातील रणनीती आखताना दिसत आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मुद्यांपेक्षा राष्ट्रवादीला मराठीचा मुद्दा भविष्यात अधिक फायद्याचा आहे. तसेच राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा आजचा निर्णय कोणाला चुकीचा वाटत असला तरी भविष्यात म्हणजे विधानसभेत तो मनसे आणि राष्ट्रवादीसाठी खूपच फलदायी ठरणार आहे हे उघड आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Rajinikanth(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x