15 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

City Co-operative Bank | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ED आनंदराव अडसूळांची चौकशी करणार

City Co operative Bank scam

मुंबई, २९ सप्टेंबर | ईडीच्या चौकशीवेळी अत्यवस्थ झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी (City Co operative Bank) काही दिवसांसाठी टळली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.

The interrogation of former Shiv Sena MP Anandrao Adsul (City Co-operative Bank), who died during the ED’s interrogation, was postponed for a few days. He will be questioned after his discharge from the hospital :

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९८० कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या अडसूळ पिता-पुत्राकडे सोमवारी कांदिवली येथील निवासस्थानी चौकशी करण्यास अधिकाऱ्यांचे पथक गेले. त्यांना समन्स बजावून ताब्यात घेतले जात असताना अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यांना गोरेगाव येथील लाइफ लाइन रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी अडसूळ यांच्या कुटुंबियांसोबत ईडीचे अधिकाऱ्याचे एक पथकही सोबत होते.

दरम्यान, सर्व चाचण्या केल्यानंतर त्यांना ४८ तास देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सुमारे १४ तास त्यांच्यासोबत असलेले ईडीचे पथक माघारी परतले. रुग्णालयातील घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे एका अधिकाऱ्याला ठेवण्यात आले आहे. अडसूळ व त्यांच्या मुलाकडे ते रुग्णालयातून घरी परतल्यावर चौकशी केली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: City Co operative Bank scam allegations over Shivsena former MP Anandrao Adsul ED enquiry.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x