29 March 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी
x

मुंबई, पुणे आणि नाशिकचे डीजे मालक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई, पुणे आणि नाशिकच्या डीजे मालकांनी भेट घेतली. ऐन सणासुदीच्या काळातच बंदी घातली गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, त्यावर काही मार्ग निघण्याचा आशेने डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन अडचणी मांडल्या.

दरम्यान, चर्चेअंती डीजे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर येत्या १९ तारखेला सुनावणी होणार असल्याने १-२ दिवस वाट पाहावी. परंतु जर मंडळ तयार असतील तर डीजे नक्की वाजवा असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे तसेच डॉल्बी वाजविण्यावर बंदी आहे.

परंतु, साउंड सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं योग्य आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाला महाराष्ट्र सरकारला केला होता. त्यावर १९ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी गणेश मंडळांनी सुद्धा मनसे अध्यक्षांची भेट घेऊन अडचणी मांडल्या होत्या.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x