17 November 2019 9:52 PM
अँप डाउनलोड

लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत आगमन ! सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष

मुंबई : आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत घरोघरी आगमन झालं. अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब नाहून निघाल्याचे चित्र आहे. सकाळपासूनच सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत घरोघरी गणरायाचं आगमन झालं. तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील विविध शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईतील लालबागचा राजा, पुण्यातील श्री. कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ पर्यंत होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र लगबग सुरू होती.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या