7 December 2021 4:26 AM
अँप डाउनलोड

व्हिडीओ: मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली होती

नवी दिल्ली : भारतीय बँकांना करोडो रुपयांचा चुना लावून भारतातून पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मोदी सरकार अडचणीत येणार विधान त्याने केलं असून मल्ल्या लंडनमधील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, ‘त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती’.

सध्या विजय मल्ल्यावर लंडनस्थित वेस्टमिनिस्टर कोर्टात ही खटला सुरू आहे. दरम्यान, बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विजय मल्ल्या म्हणाला की, ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते’. कोर्टातील सुनावणीनंतर पत्रकारांनी जेव्हा अर्थमंत्र्यांशी झालेल्या भेटीविषयी अधिक माहिती देण्याबाबत विचारले तेव्हा मल्ल्याने सांगितले की त्याला या भेटीविषयी प्रसार माध्यमांना अधिक तपशील द्यायचे नाहीत.

दरम्यान, वेस्टमिनिस्टर कोर्टात भारतीय अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी केलेल्या विशेष सेलचा व्हिडिओ न्यायालयात प्रकाशित केला. भारतीय कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये अशी विनंती मल्ल्याने केली होती. कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे सोपवण्यात येईल. मल्ल्या कोर्टाच्या निर्णयाला पुढील कोर्टात आव्हानही देऊ शकतो. विजय मल्ल्यावर तब्बल ९ हजार कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x