18 May 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेच्या 'या' निर्णयाने ग्राहकांना आर्थिक फटका बसणार

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गुरुवारी झालेल्या पतआढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदरात (रेपो रेट) कोणताही बदल न करता तो ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला. मात्र, त्यानंतरही चार प्रमुख बँकांनी गृहकर्जासह अन्य कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँक यांचा समावेश आहे.

चारही बँकांनी सर्व कर्जांच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) सुधारणा केली आहे. एमसीएलआर हा मूलभूत किमान दर आहे ज्याच्या आधारे बँका ग्राहकांना कर्ज देतात. बीओबीने एक वर्षाच्या एमसीएलआरमध्ये सुधारणा करून तो ८.७० टक्के केला आहे. तो आता ८.६५ टक्के झाला आहे. हे नवे दर १२ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. कॅनरा बँकेनेही एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्के वाढ केली आहे. ती आता वाढून ८.७० टक्के झाली आहे. हे नवे दर १२ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR

बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. एक वर्षाचा एमसीएलआर ८.५० टक्क्यांवरून ८.६० टक्क्यांवर गेला आहे. सुधारित दर १० ऑगस्टपासून लागू होणार आहेत. तर खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने कर्जाचा दर ०.१५ टक्क्यांनी वाढवून ७.७५ टक्के केला आहे. सुधारित दर १४ ऑगस्टपासून लागू होतील.

ग्राहकांच्या मासिक हप्त्यात होणार वाढ

बँकांच्या या निर्णयामुळे ग्राहकांवरील बोजा वाढणार आहे. होम लोन, पर्सनल लोन, कार लोन आदींचा ईएमआय वाढणार असून या सर्वांवर एमसीएलआरचा थेट परिणाम होत आहे. जर एखादी बँक एखाद्या ग्राहकाला कर्ज देत असेल तर ती एमसीएलआर दराने व्याज दर आकारते. त्यात काही बदल झाल्यास कर्जाच्या खर्चावर म्हणजेच व्याजदरावरही परिणाम होतो.

‘या’ बँका आधीच वाढल्या आहेत

यापूर्वी एचडीएफसी, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानेही एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. त्यांचे दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra loan EMI interest rates hike check details on 12 August 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x