11 December 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मूठ आवळून 'बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलणाऱ्या फडणवीसांची पुस्तकावरून बोलती बंद?

MP Sanjay Raut, Aaj ke Shivaji Narendra Modi

सातारा: दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

राज्यातील भाजपच्या कोणत्याही सभेत वारंवार मूठ आवळून ‘बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या या पुस्तकाच्या विषयावरून दिसेनासे झाले आहेत. किंबहुना मोदींच्या भरोशेच मुख्यमंत्री झालेले फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असं म्हणण्याचं देखील धाडस करतील असं वाटत नाही. कारण काँग्रेसचे नेते जसे सोनियाजी-सोनियाजी करत असतात तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ‘मोदीजी-मोदीजी’ असा प्रकार आहे. त्यामुळे फडणवीस असतील किंवा राज्य भाजप यापैकी कोणीही निषेधाची भूमिका घेणार नाही असंच चित्र आहे. त्यामुळेच खासदार संजय राऊतांनी देखील भाजपाला यावरून खडा सवाल केला आहे.

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची धूळ बनण्याची देखील लायकी नसलेले राजकरणी, आज त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःचे राजकीय अजेंडे राबवत असल्याने अनेक शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. रयतेच्या भल्यासाठी आयुष्य खर्ची घालवणारे आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार केला होता. ‘शिवछत्रपतीका आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ असं प्रचार करून भाजपने स्वतःची राजकीय पोळी भाजली आणि आज त्याच मोदींचा राजकीय हेतूने अघोषित राज्याभिषेक करून राजकारणाची सर्वोच्च पातळी गाठली आहे असंच म्हणावं लागेल.

भाजपमध्ये एखाद्या विषयाने डोकं वर काढलं की त्यामागे भविष्यातील हेतूने मोठी राजकीय खेळी असते आणि त्यासाठीच त्यांचा ‘थिंक टॅंक’ नियोजनबद्ध काम करत असतो. यापूर्वी देखील उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप नेत्यांनी वारंवार मोदींची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. यासाठीच भाजपचा थिंक टॅंक काम करत असतो आणि त्यासाठी पक्षातून नियोजनबद्ध काही नेत्यांमार्फत पेरणी केली जाते. अशी पुस्तकं प्रकाशित करण्यापूर्वी मोदी-शहांना कल्पना नसणार हे निव्वळ अशक्य आहे. मात्र तोच रणनीतीचा भाग असतो. मराठयांच्या नावाने राजकरण करत, प्रथम राज्यातील कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपती घराण्याचे वंशज भाजपात आणले आणि भविष्यात उद्भवणारा अंतर्गत वाद आधीच क्षमविण्याची रणनीती आखली असावी असं राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. त्यानंतरच संबंधित पुस्तक प्रकाशित करून भविष्यातील हिंदुत्वाची पुढची रणनीती सूर केल्याचं म्हटलं जातं आहे. ज्याचा पुढचा अध्याय राम मंदिराच्या उदघाटनानंतर समोर येईल. मात्र राज्यातील महाराजांच्या वंशजांची या विषयावरून झालेली अवस्था भाजप ‘थिंक टॅंक’च्या रणनीतीचा विजय मानावा लागेल. कारण तसं असतं तर आज खासदार संभाजी राजे, उदयराजे आणि शिवेंद्रराजे यांनी भाजपचा त्याग करत कणखर भूमिका घेतली असती, पण तसं झालं नाही.

तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. त्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जरी भाजपमध्ये असल्याने शांत असले तरी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. मात्र, भाजपच्या कृत्यावर महाराष्ट्र संतापलेला असताना साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले मूग गिळून शांत बसल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येतं आहे.

 

Web Title: Maharashtra BJP should clear its stand over book Aaj ke Shivaji Narendra Modi says shiv sena MP Sanjay Raut.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x