30 June 2022 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी ३ आरोपींचा शोध सुरु.

मुंबई : कालच्या कमला मिल आगप्रकरणी तीन आरोपी आणि हॉटेलचे मालक यांना मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस जाहीर केली आहे. आरोपी भारता बाहेर पसार होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरातील तसेच देशातील सर्व विमानतळांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

क्रिपेश व जिगर संघवी आणि अभिजित मानकर अशी ‘वन अबव्ह’ हॉटेलच्या मालकांची नवे असून, ते अटकेच्या भीतीने देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेता तीनही आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस जाहीर केली आहे. सिग्रिड ऑस्पिटालिया अँड एंटरटेनमेंट असं त्यांच्या मालकीच्या कंपनीचे नावं आहे.

कलमा मिलमधील, कालच झालेल्या अग्नितांडवात जवळपास २२ जण जखमी झाले तर १५ जणांचा आगीत होरपळून आपले प्राण गमावले. हे अग्नीकांड केवळ महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच घडले असा आरोप सध्या केला जातोय. या प्रकरणी ५ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, राज्यशासनाने हि याची गंभीर दखल घेतली आहे.

भविष्यात अश्या घटना घडू नयेत म्हणून सरकार कोणत्या उपाययोजना करणार याकडेच सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x