ड्रग पब ऍण्ड पार्टी संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या नाईटलाईफ गँगमुळे सुशांतचा बळी - आ. आशिष शेलार
मुंबई, २७ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, सीबीआय तपास करत असल्यापासून सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये रोज नव्याने खुलासे होत आहे. अशातच आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियावर आता ड्रग्ससंबंधी आरोप लावले जाात आहे. तसे पुरावे तिच्या चॅटींगमधून मिळाले आहेत. त्यामुळे या केसमध्ये एक वेगळं वळण आलं आहे.
दरम्यान या मुद्द्यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी आरोप केले आहेत. ड्रग पब ऍण्ड पार्टी संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या नाईटलाईफ गँगने सुशांतचा बळी घेतल्याचं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. या “ड्रग-पब-पार्टी” टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल!, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच “ड्रग- पब-अँड पार्टी” गँगने सुशांत सिंह रजपूतचा बळी घेतला!
या “ड्रग-पब-पार्टी” टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 27, 2020
News English Summary: BJP MLA Ashish Shelar tweeted that Sushant was killed by a nightlife gang promoting drug drug and party culture. Who are the members of this drug-pub-party gang? Who is protecting them asked BJP MLA Ashish Shelar.
News English Title: Night life gang cost Bollywood actor Sushant Singh Rajput life says BJP MLA Ashish Shelar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News