20 September 2021 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त
x

Alert | पावसाने जोर पकडला, राज्यातील या भागात अतिवृष्टीचा इशारा - वाचा सविस्तर

Rain Update

मुंबई, १२ जुलै | मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मुंबईसह लगतच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान सकाळी कोसळलेल्या पावसाने नंतर मात्र मुंबईत विश्रांती घेतली. हवामानात होत असलेले बदल आणि गारव्यामुळे मुंबईकरांची ऊकाड्यापासून सुटका झाली. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेचं किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १३ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.

तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rain alert given by weather department news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x