17 November 2019 9:56 PM
अँप डाउनलोड

नाणार प्रकल्पाचा करार सुद्धा झाला, आता पुन्हा 'मी मंत्रिपद सोडेन'

मुंबई : स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा नाणार प्रकल्प लादण्यात आला आहे. नाणार मध्ये सभा घेऊन ‘मी नाणार संबंधित अध्यादेश रद्द करण्याची घोषणा करतो आहे’ अशी घोषणा करणारे राज्याचे उद्यीगमंत्री सुभाष देसाईंना दिल्लीत पारपडलेल्या घडामोडीं विषयी विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपद सोडून राजीनामा देईन असा इशारा दिला आहे.

कोकणात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाच्या करारावर सोमवारी अधिकृत पणे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याबाबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. स्थानिकांचा तीव्र विरोध आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करत असून त्यांच्या संयमाची आणखी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे देसाई म्हणाले.

विशेष म्हणजे मला सुद्धा माध्यमांमधूनच दिल्लीतील करारासंदर्भात माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितलं आणि आम्हाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आमचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना सुद्धा कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितल.

हॅशटॅग्स

#Shivsena(741)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या