19 April 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा: धनंजय मुंडे

मुंबई: २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत EVM हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या धक्कादायक दाव्यामुळे देशातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी रॉ किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, अशी मागणी एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी केली आहे.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षान EVM मशीन हॅक करुन विजय मिळवल्याचा खळबळ जनक दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञानं केला. ‘गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी याआधी सुद्धा त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, याची सखोल चौकशी व्हावी,’ अशी मागणी धनंजय मुंडेंनी उचलून धरली आहे. सदर गंभीर प्रकरणी त्यांनी एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, लंडनमध्ये सुरू असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या अमेरिकन सायबर तज्ज्ञानं EVM मशीन सहज हॅक केल्या जाऊ शकतात, असा धक्कादायक दावा केला. त्यात महाराष्ट्र, युपी आणि गुजरातमधील निवडणुकांवेळीही EVM हॅक झाल्याचा दावा त्यानं केला. ग्रॅफाईट आधारित ट्रान्समीटरच्या मदतीनं EVM उघडता येऊ शकतं. विशेष म्हणजे याच ट्रान्समीटर्सचा वापर २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता, असं सूजा यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x