14 December 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Raigad Landslide | अनेक निष्पापांचा दुर्दैवी मृत्यू, दरडग्रस्त गावांच्या यादीत या गावाचा समावेश नव्हता, शिंदे-फडणवीस सरकारचा भोंगळ कारभार

Raigad Landslide

Raigad Landslide | रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. रात्रीच्या झोपेतच अनेक जणांना मृत्यूने कवेत घेतले. या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर ७५ जणांची सुटका करण्यात आली आहे. परंतु या दुर्घटनेत १०० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Irshalwadi 1

प्राथमिक माहितीनुसार इर्शाळवाडी येथे ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Irshalwadi-2

दरम्यान, गावावर दरड कोसळल्याने या दुर्घटनेत पाच लोक दगावले आहेत. तसेच 34 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तब्बल 100 लोक या दरडीखाली दबल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे गाव दोन डोंगरांच्यामध्ये आहे. तरीही या गावाचा दरडप्रवण गावांच्या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

इर्शाळवाडी येथे वेगाने मदतकार्य सुरू आहे. इथे 45 घरांची वस्ती आहे. दरड कोसळल्याने 15 ते 17 घरे दबली आहेत. पाऊस सुरू आहे. गाड्या जाऊ शकत नाहीत. जेसीबीही जाऊ शकत नाही. त्यामुळे मॅन्युअली काम सुरू आहे. जवान जीव लावून काम करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. सरकारने 8108195554 हा हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

irshalwadi-3

News Title : Raigad Landslide 5 peoples dead and many are missing check details on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Raigad Landslide(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x