5 August 2021 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | पौष्टिक नाचणी डोसा बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा
x

कोरोना संकटात ६ महिने बिळात लपून बसणाऱ्यावर काय बोलायचं? | लंकेंचा विजय औटींना टोला

MLA Nilesh Lanke

पारनेर, १२ जुलै | शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. विजय औटींच्या टीकेला निलेश लंके यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिल्याने विजय औटींचा पुन्हा त्रागा होण्याची शक्यता आहे. मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे‌.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार औटी यांनी मी सर्वांचा बाप असल्याची दर्पोक्ती केली होती.आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार औटी यांच्या दर्पोक्तीचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांना स्वतःच्या माणसांना कोरोना संकटात वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी उपस्थित केला.

पंचायत समितीचे माजी सभापती राहूल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार लंके बोलत होते. मागील आठवड्यात माजी आमदार विजय औटी यांनी आमदार लंके यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका करीत आपण आमदार असतो तर,करोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंपैकी किमान ५० टक्के जीव वाचवले असते असा दावा केला होता.

आमदार लंके म्हणाले की, कोरोना संकटकाळात जे सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझा पींड काम करण्याचा आहे.मी कामातच राम मानणारा आहे. करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोवीड उपचार केंद्रात तब्बल १७ हजार १०० रुग्ण करोनामुक्त झाले.प्रत्येकी १ लाख रुपये खर्च आला असता असे गृहीत धरले तरी तालुक्यातील सर्वसामान्यांचे अब्जावधी रुपये वाचले. ज्यांना स्वतःच्या जवळच्या माणसांना वाचवता आले नाही ते दुसऱ्यांना काय वाचवणार असा उपरोधिक सवाल करतानाच माजी आमदार औटी यांनी केलेल्या टिकेचा आमदार लंके यांनी खरपूस समाचार घेतला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Nilesh Lanke replay to Shivsena former MLA Vijay Auti news updates.

हॅशटॅग्स

#NileshLanke(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x