23 September 2021 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

सातारा भाजप | शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये सशस्त्र मारामारी | अनेकजण गंभीर जखमी

Satara Politics

सातारा, ०९ सप्टेंबर | साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली. बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सातारा भाजप, शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये सशस्त्र मारामारी, अनेकजण गंभीर जखमी – Huge clash between MLA Shivendraraje Bhosale and MP Udayanraje Bhosale supporters in Satara :

खंदारे विरुद्ध भोसले गट:
साताऱ्यात रात्री सव्वा आठच्या आसपास सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याचे चर्चा आहे.

रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी:
याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारामारीत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मारामारी झाल्यावर रुग्णालयाच्या परिसरात समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Huge clash between MLA Shivendraraje Bhosale and MP Udayanraje Bhosale supporters in Satara.

हॅशटॅग्स

#Satara(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x