नितेश राणे आणि युवासेना वाद पेटणार | नाशिकच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले
मुंबई, १६ मार्च: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
मात्र आता हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. याची पहिली प्रतिक्रिया नाशिकमध्ये पाहायला मिळाली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर मोठी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे ते करताना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील केली.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी पुन्हा त्याला प्रतिउत्तर दिलं आहे.आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी दिला. आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्ही देखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.
News English Summary: In Nashik, Shiv Sena workers made a big announcement in front of the BJP office. What is special is that while doing so, Yuvasena activists tried to leave stray dogs in the BJP office. He also shouted slogans against Narayan Rane, Nitesh Rane and Nilesh Rane.
News English Title: Nashik Yuvasena aggressive after MLA Nitesh Rane made allegations against Varun Sardesai news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News