14 December 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

देशाच्या प्रमुखांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली होती | पवारांचा भाजपाला टोला

Sharad Pawar, Dhananjay Munde

मुंबई, २५ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रोकठोक भूमिका मांडली. जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनी देखील शपथपत्रात माहिती लपवली होती, असा टोला शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडेंनी शपथपत्रात माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी पाहाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.

 

News English Summary: Against the backdrop of allegations of rape against state social justice minister Dhananjay Munde, NCP president Sharad Pawar today once again took a restraining stance in front of the media. We have full faith in the Mumbai Police, taking a stand that Dhananjay Munde will not resign until the truth of the allegations comes to light. He will properly investigate the matter, said Sharad Pawar.

News English Title: Sharad Pawar reply to media over allegations on Dhananjay Munde news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x