15 June 2021 10:05 PM
अँप डाउनलोड

नाशिकमध्ये आम्ही केलेला विकास भाजप स्मार्ट सिटीच्या नावाखाली दाखवत आहे : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधीत करताना शहरातील अनेक गंभीर विषयांना हात घातला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान राज ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर बोलताना नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लक्ष केलं. देशात १९८४ मध्ये काँग्रेसला म्हणजे राजीव गांधींना आणि त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. पण बहुमत मिळाल्यानंतरही काय केले? तर नोटाबंदी केली. बहुमत मिळाल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. विशेषम्हणजे ज्या व्यापा-यांनी मोदींना सत्तेवर आणलं, त्याच व्यापाऱ्यांची मोदींनी पहिली वाट लावली.

नाशिकमध्ये मनसेने सत्ताकाळात केलेल्या विकासकामांचा उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, आम्ही नाशिक दत्तक घेणार, परंतु नंतर तिकडे फिरकले सुद्धा नाही. नाशिक शहरात विकास आम्ही केला आणि भाजप सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली, आम्ही केलेली कामे दाखवत आहेत. लाख कोटी रूपयांच्या कामांच्या भाजपचे मंत्री घोषणा करतात, पण त्यांच्या मंत्र्यांना कागद पेन दिल्यास तो सांगत असलेला आकडा लिहिता सुद्धा येणार नाही. भाजप पक्ष केवळ काँग्रेसच्या नावाने बोंबा मारतात आहे, पण स्वत:चं काय? दुस-यांची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात भाजपाला काय आनंद वाटतो तेच कळत नाही, असे मनसे अध्यक्ष खोचक पणे म्हणाले.

दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या कामाचा हवाला देताना राज ठाकरे म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा पाणीप्रश्न एकटे सरकार सोडवू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग हवा. लोकसहभागच हवा असेल तर सरकार हवे कशाला? अशी टीका राज ठाकरे यांनी केली.तसेच इतर पक्षातून उमेदवार आयात करून तो निवडून आल्यास तो भाजपाचा विजय कसा? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. इतर राज्यातील लोक येऊन तुमचे रोजगार बळकावत आहेत आणि सर्वच शहरांमध्ये मराठी माणसांचे प्रमाण कमी होत आहे. तेच इतर राज्यातील लोक येऊन स्वत:चे मतदारसंघ तयार करतील आणि निवडणूक जिंकतील. आपण काय करतो आहोत? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x