27 July 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

देशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.

नवी दिल्ली : सरकारने डिजिटल इंडिया च्या नावाने ढोल बडवले खरे, पण त्याच मोदी सरकारने ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारी सुरक्षा आणि त्यावरील उपाय यावर किती विचार केला आहे यावरच विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे.

स्वतः माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीच ही ऑनलाईन फसवणुकीची आकडेवारी प्रसारित केली आहे. २१ डिसेंबर २०१७ पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग मार्फत ऑनलाईन ग्राहकांची तब्बल १७९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत केवळ गेल्या ३ महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची तब्बल १० हजार २२० प्रकरण समोर आली आहेत. त्यात एकूण आकडा १११. ८५ कोटी इतका आहे असे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत समोर केले आहेत.

ऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.

एकूण ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रानंतर हरियाणा (२३८ प्रकरणं), कर्नाटक (२२१ प्रकरणं), तामिळनाडू (२०८ प्रकरणं) आणि दिल्ली (१५६ प्रकरणं) समोर आली आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x