चेन्नई : तामिळनाडू आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांनी आज आपल्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या चाहत्यांसाठी ते देवच आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत आज ही घोषणा चेन्नई मध्ये करण्यात अली.
सुपरस्टार रजनीकांत आपला स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत आणि त्यांच्या पक्षाच नाव लवकरच घोषित केलं जाईल असे सांगण्यात आले. त्यांचा पक्ष तामिळनाडूतील सर्वच म्हणजे २३४ जागा लढवणार आहे अशी ही घोषणा त्यांनी केली. माझा पक्ष लोकशाही आणि लोकशाहीचे रक्षक म्हणून काम करू आणि चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवेल. काही लोक राजकारणाच्या नावावर लोकांना लुटत आहेत.
रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा अखेर आज झाली असली तरी त्यांचा तामिळनाडू राजकारणातील प्रवेशाने राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
