नवी दिल्ली : सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मुलगा फैसल आणि जावई इरफान सिद्दीकी अडचणीत आले असून, ते ५०० कोटीच्या गैव्यवहारा प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.

ईडीने या प्रकरणी अहमद पटेलांचा मुलगा फैसल आणि जावई इरफान सिद्दीकी यांची चौकशी सुध्दा सुरु केल्याचे समजते. अहमद पटेल हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. अहमद पटेल आणि त्यांचे कुटुंबिय ५०० कोटीच्या गैव्यवहारा प्रकरणी ईडीच्या रडारवर आल्याने अहमद पटेलांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

गांधी घराण्याशी जवळचे संबंध असलेले अहमद पटेल हे काँग्रेस मधील एक मोठे वजनदार नेते समजले जातात.

Ahmed Patel Son In Law and son under ED Focus