13 April 2021 3:19 AM
अँप डाउनलोड

मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता: संभाजी भिडे

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडेंनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन करताना हे विधान केले आहे, ज्यामुळे पुन्हा वाद उफाळून येऊ शकतो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुणेकरांनी शनिवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज्यांच्या पालख्यांच तसेच वारकरी भाविकांचं स्वागत केलं. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी सुद्धा संचेती हॉस्पिटल पूल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत स्वयंसेवकासह सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी दोनच्या नंतर त्यांनी अनेक धारकऱ्यांना स्वतः मार्गदर्शन केलं. त्यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणाले की,’समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, असं धक्कादायक विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पुढे संभाजी भिडे म्हणाले की, हिंदुत्वावर विश्वास प्रत्येकाने गावागावात सभा संमेलन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. तसेच ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो, त्यामुळे तो अधिक बळकट करण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे आवाहन संभाजी भिडेंनी उपस्थितांना केले.

गेल्या वर्षी शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता हे ध्यानात ठेऊन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर चोख बंदोबस्त केला होता.

हॅशटॅग्स

BJP(437)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x