1 February 2023 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा Nykaa Share Price | नायका शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
x

कोरोना रुग्ण १००% बरे सुद्धा होतं आहेत; रुग्णांनी आत्महत्येचा विचारही करू नये

Covid19, Corona Crisis, patient suicide

नाशिक, ११ एप्रिल: नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे कोरोना झालेले अनेक रुग्ण १०० टक्के बरे होऊन घरी परतत असून देखील लोकांनी मनात भीती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रतीक कुमावत हा प्लंबिंगचे काम करीत असे. मागील दोन-तीन दिवसांपासून घसा दुखत असल्याने त्याला करोना संसर्गाच्या संशयाने घेरले होते. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील एका खासगी डॉक्टरांकडे त्यानं उपचारही घेतले होते. परंतु, शनिवारी सकाळी अचानक त्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. घरातील लोखंडी पाईपला साडी बांधून त्यानं गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली असून करोनाच्या आजाराच्या भीतीमुळं आत्महत्या केल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर पोहचली आहे. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पंतप्रधानासंह देशभरातील प्रशासन करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

News English Summary: While the number of coronary arrests in Nashik district is increasing day by day, a youth in Nashik Road, Nashik, has committed suicide by writing that he has coronas. The incident unfolded this morning. Notably, many coronary patients are returning home with 100 percent recovery, but people are also seeing fear.

News English Title: Story Corona Crisis young man commits suicide in Nashik due to fear of Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x