बळीराजा दुर्लक्षितच | गेल्या ६ महिन्यांत राज्यात रोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई, ७ ऑगस्ट : करोनाच्या संकटाने राज्याचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्रामुळे राज्य सरकारसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून या महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. खासकरून फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे फळे आणि भाजीपाला शहरातील मार्केटमध्ये पोहोचू शकले नाही. परिणामी संपूर्ण मालाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
जानेवारी ते जून दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये जूनमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये मालांची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भावही कोसळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत लॉकडाऊनमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या कमी आहे. गेल्या वर्षी २०१९मध्ये या सहा महिन्यांत १३३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गेल्या वर्षी मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला होता. तर पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पिके नष्ट झाली होती.
दुसरीकडे फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना सुरु केली होती. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू होती.
शेतकरी आत्महत्या रोखण्यात योजना अयशस्वी ठरल्याने आघाडी सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये फडणवीस सरकारने बळीराजा चेतना अभियान योजना तयार केली होती. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यास सुरुवातही झाली होती.
News English Summary: Due to the farmers’ suicide session, there is a big appeal before the state government. In the last six months, 1,074 farmers have committed suicide in the state and an average of six farmers have committed suicide every day from January to June.
News English Title: Farmer suicide 1074 farmers ended lives in Maharashtra in 6 months News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा